गुरुकुल शाळेत पर्यावरण दिन साजरा

। रसायनी । वार्ताहर ।

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चौक येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री स्वामिनारायण गुरुकुल नवी मुबंईचे संचालक परमपूज्य विश्‍वमंगलदास स्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्वांची आहे. यासंबंधीची जाणीव प्रत्येकाला झाली तर पर्यावरण संवर्धनासाठी ठोस असे कार्य उभे राहू शकेल, असे त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. या दिवशी शाळेच्या परिसरात अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात परमपूज्य ब्रम्हस्वरूप स्वामीजी, प्राचार्य डॉ. हरिबाबू रेड्डी, गुरुकुलचे सर्व शिक्षक वर्ग व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version