शिवशंभु प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

शिवशंभु प्रतिष्ठानचा आठवा वर्धापन दिन सोहळा रोहा शहरातील राम मंदिरात उत्साहाने संपन्न झाला.यानिमित्त अलिबाग येथील संस्थेच्या आणि शिवशंभु प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला तरूणाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शिवकालीन नाणी प्रदर्शनासाठी मुंबई येथील सुरेश उंडरे म्हणून माहित देण्यासाठी लाभले होते. पुस्तक विक्री प्रदर्शनासाठी पुण्यातील पुस्तक विक्रेते सुयश बुक डेपो यांनी सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करुन दिली. या वेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अमरदीप म्हात्रे, अनंता भोसले यांनी उपस्थित तरूणांन मार्गदर्शन केले प्रतिक पाटणकर यांनी उपस्थित मावळ्यांना शिवरायांचे विचार सांगितले.अध्यक्ष विशाल तेलंगे यांनी आभार मानले.

Exit mobile version