जिल्हा ग्रंथालयाचा 104 वा वर्धापन दिन साजरा

अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय जिल्हा ग्रंथालयाचा 104 वा वर्धापन दिन वाचनालयाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.गौतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी विजया दशमी व पुस्तक वाचन दिनानिमित्त ग्रंथांचे पूजन करण्यात आले.
प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.गौतम पाटील यांच्या हस्ते शारदा देवीचे पूजन करून आरती करण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक वसंत चौलकर, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल रजिता माळवी, लेखनिक गौरी ठाकूर जगे यासह वाचकवर्ग, शासकीय ग्रंथालयातील सवेकवर्ग उपस्थित होता. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे शासकीय आदेशाचे पालन करीत सदरचा कार्यक्रम करण्यात आला.

Exit mobile version