सेवालाल महाराजांची 283 वी जयंती साजरी

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग मधील कामगार नाका पी.एन.पी.नगर येथे मंगळवारी (15 फेब्रुवारी) श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ, नाका कामगार अलिबाग बंजारा समाज यांच्यातर्फे श्री संत सेवालाल महाराज यांच्या 283 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रशांत नाईक , उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेवक अजय झुंझारराव, प्रकाश दर्गु राठोड बंजारा समाज अध्यक्ष, गोरख राठोड, अनिल राठोड, शंकर जाधव, कणिराम पवार, चंदर पवार, लक्ष्मण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी शास्त्रीनगर येथे अभिषेक घालून व होम करून झाली. तर, दुपारी 12 वाजता अविवाहीत असणार्‍या 200 मुली डोक्यावर कलश घेऊन शास्त्रीनगर ते कामगार नाका पी.एन.पी.नगर, अलिबागपर्यंत नाच करीत आल्या. त्यानंतर समाजाचे धार्मिक कार्यक्रम व भजन व किर्तनाचा सोहळा करण्यात आला.

Exit mobile version