| वावे | वार्ताहर |
वावे, ता.अलिबाग येथे श्री रामजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.30) सकाळी 9 वाजता श्रीराम प्रासादिक भजन मंडळाचे भजनीबुवा बळीराम गावंड, मृदंगमणी हरिश्चंद्र गावंड, दामोदर गावंड, जनार्दन गावंड, दिलीप पाटील, संदीप गायकर, वसंत गावंड यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. जन्मसोहळ्याचे पोथी वाचन, दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा होणार आहे. महाप्रसादाची व्यवस्था दुपारी 1 ते 4 यावेळेत होणार आहे. पंचक्रोशीतील बेलोशी, महाजने, उसर, आंदोशी, वळवली, आंबेपूर या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत.