। सुकेळी । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील वनक्षेत्रामध्ये मंगळवारी (दि.15) वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नागोठणे वनक्षेत्रपाल अधिकारी सुहास रणवरे, ऐनघर चौकीचे पोलिस उपनिरिक्षक परशुराम भोईर व ऐनघर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील वनक्षेत्रातील जागेमध्ये अनेक प्रकारच्या रोपाची वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये पिंपळ, वड, काजु, आंबे अशा अनेक प्रकारच्या रोपाचे रणवरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नागोठणे वनक्षेत्रपाल अधिकारी सुहास रणवरे, ऐनघर पोलिस चौकीचे पोलिस उपनिरिक्षक परशुराम भोईर, ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोहरभाई सुटे, सदस्य किशोर नावळे, रोहीदास लाड, प्रकाश डोबळे, भगवान शिद, वनक्षेत्रपाल के.डी.ठाकुर, परिमंडळ वनअधिकारी कानसई, वनरंक्षक के.जी.सांबरी, आर.बी.शिंदे, ए.बी.धुळे आदी उपस्थित होते.