। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.11) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव प्रविण ठाकूर व उपाध्यक्ष सुनिल थळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी सरपंच उनीता थळे, चांदोरकर, माजी उपसरपंच समद कुर, चंद्रकांत खोत, संजय शिंदे, मुर्तुजा कुर, आत्माराम पंडम, बाळाराम थळे, गोविंद अनमाने, मधुकर सूद, दिलीप मोंढे, विवेक जोशी, सुरेश राऊत, सतिश घाडी, सचिन घाडी, रुस्तुम कुर, राजेंद्र घरत, सूचित थळे, संतोष बांद्रे, मनिष खाडे, शैलेश तिर्लोटकर, संजय अनमाने, अशोक मोंढे, रुपेश नागावकर, संदेश पाटील, राकेश पवार, गितेश ठकरुळ, नितेश ठकरुळ, सुयोग अनमाने, रोशन अनमाने, अनिल अनमाने, प्रविण घाडी, साहिल कुर, शबाब खान, विलास पाटील, अक्षय नागावकर, शिराज खान, जलील पठाण यांच्यासह मूनवली, सोगाव व पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







