सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर महोत्सव

। रसायनी । वार्ताहर ।
बामसेफच्या युनिटी ऑफ मुळनिवासी बहुजन समाज, अखिल आगरी समाज परिषद व पनवेल, उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील महात्मा फुले कोकणस्तरीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा व सत्यशोधक समाज -शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र कुंभार, लक्ष्मण यादव, प्रशांत हडकर, संतोष आंबेकर, जे.डी.तांडेल, भगवान गायकवाड, प्रसाद मांडवकर, अ‍ॅड. सुमिता पाटील, मुक्ती जुबेर रब्बानी, गंगाराम पेडणेकर, मावजी राठोड, सुरेश पाटील, संतोष घरत, एन.बी.कुरणे, संजय घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version