धुतुम ग्रामपंचायतीचा केंद्राकडून गौरव

| चिरनेर | वार्ताहर |
केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने 22 ते 24 सप्टेंबर पर्यंत पुणे येथे कचरा व्यवस्थापनाबद्दल कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेत महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीच्या शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दखल घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात ग्रामसेवक विनोद मोरे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुणे येथे आयोजित केलेल्या या कार्यशाळेत देशातील विविध राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आले होते . यावेळी धुतुम ग्रामपंचायत करत असलेल्या कचरा निर्मूलनाची चित्रफित दाखविण्यात आली होती ग्रामपंचायततीने आयओटीएल कंपनीच्या सहकार्‍यांनी दोन वर्षांपूर्वी 26 लाख 85 हजार रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात येऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाते देश पातळीवर या प्रकल्पाची दखल घेतल्याबद्दल धुतुम ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात येत आहे .

असे प्रकल्प दुसर्‍या ग्रामपंचायतीने राबविल्यास मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मूलन होण्यास मदत होईल धुतुम ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक विनोद मोरे, सरपंच रेशमा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यास मोलाचे कार्य केले

Exit mobile version