खोपोली पालिकेचा केंद्रातर्फे सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण अभियान पुरस्कार
खोपोली | वार्ताहर |
खोपोली नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात केंद्र सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात वेस्ट झोनमध्ये 5 वा आणि भारतात 24 क्रमांक आल्याबद्दल केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपाध्यक्षा विनीता कांबळे, आरोग्य सभापती अर्चना पाटील, मुख्याधिकारी अनुप दुरे, माजी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नगर परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.ही सन्मानाची आणि गौरवाची बाब असून या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय खोपोलीकर, सफाई कामगार आणि स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिवसरात्र राबणार्या टीमसह लोकप्रतींनिधींचे असल्याचे मत मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी व्यक्त केले होते. तर हा पुरस्कार खोपोलीची जनता आणि सफाई कामगारांमुळे मिळाल्याचे मत आरोग्य सभापती अर्चना पाटील आणि नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी व्यक्त केले होते. यावेळी नगरसेवक मोहन औसरमल उपस्थित होते. केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाल्याने खोपोली पालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version