विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ तयार होण्याचा उद्देश
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील खैरेखुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत, हाच उद्देश लक्षात घेऊन या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रप्रमुख दिपक पाबरेकर यांच्या अध्यक्षते खाली केंद्रातील 17 शाळांनी या विज्ञान प्रदर्शनासाठी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी 70 पेक्षा जास्त प्रतिकृतींची मांडणी केली होती. त्यामध्ये पाणी, जमीन, भौगोलिक बदल, हवा व तिचा वापर असे एक ना अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांनी प्रतिकृत्या मांडल्या होत्या. या विज्ञान प्रदर्शनातून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करून प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. तसेच, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील सहभाग प्रमाण पत्र देण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला सरपंच मुजम्मील गिते, सरपंच अतिश मोरे, अब्बास मुकादम, इर्शाद पेडेकर, शिक्षक जाधव, मुंगसे, कांबळे, सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि खैरेखुर्द राजिप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद गिते, उपाध्यक्षा नाजिया मुकादम व सर्व सदस्य उपस्थित होते.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक जुहा नागोठकर (खैरे खुर्द उर्दू शाळा), द्वितीय क्रमांक सृष्टी कासकर व सलोनी सातामकर (न्हावे शाळा), तर तृतीय क्रमांक उमेरा धनसे (खैरे उर्दू शाळा). लहान गटात प्रथम क्रमांक श्लोक गोणे व शिवाणी विचारे (चणेरा शाळा), द्वितीय क्रमांक सॉलेहा फकीर (चणेरा हायस्कूल), तर तृतीय क्रमांक नवखार शाळेला मिळाला आहे. तसेच, टाकाऊ पासून टिकाऊत प्रथम क्रमांक अस्मा गिते, द्वितीय क्रमांक उमर मुकादम तर, तृतीय क्रमांक मोहम्मद गिते यांना मिळाला आहे.