रेल्वे फाटक दुसर्या दिवशीदेखील वाहतुकीस खुले
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक येथील वाहनांना ये-जा करण्यासाठी वापरात असलेले फाटक आज दुसर्या दिवशीदेखील खुले आहे. मध्य रेल्वेकडून हे फाटक 7 ऑक्टोबर सकाळी आठपासून 12 ऑक्टोबर सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार होते. त्याबद्दल गावाच्या बाहेर फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालक हे आंबिवली किंवा दामत येथील फटकाचा वापर करून प्रवास करीत आहेत. दरम्यान, अन्य रेल्वे गेट यांचा वापर करण्यासाठी तब्बल पाच ते आठ किलोमीटर अंतर जास्तीचे पार करावे लागत असून, मध्य रेल्वेकडून फाटक जाहीर केल्याप्रमाणे बंद केले नाही आणि दुसर्या दिवशीदेखील सुरू ठेवून वाहनचालक यांना गंडविले आहे.
मध्य रेल्वे वरील मुंबई-पुणे मार्गावर कर्जत एंडकडील नेरळ या जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुढे मध्य रेल्वेचे फाटक आहे. 87 किलोमीटरवर गेट नंबर 21 येथे असलेल्या फाटकाचा वापर नेरळ गाव जोडण्यासाठी होत असून, नेरळ पूर्व भागातील असंख्य गावातील रहिवासी यांच्याकडून त्या फाटकाचा वापर नेरळच्या मुख्य बाजारपेठ भागात येण्यासाठी होत असतो. त्यामुळे या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक मोठी आहे. त्यामुळे सातत्याने त्या भागातील रेल्वे मार्गिकेखाली असलेल्या पृष्ठाभागाचे नुकसान होत असते आणि त्यामुळे त्याची दुरुस्ती सातत्याने करावी लागते. त्या पृष्ठभागाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पीडब्ल्यूआय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या फाटकाच्या वापर करणारे वाहनचालक यांना माहिती व्हावी यासाठी नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, फाटक क्रमांक 87 मधील रेल्वे मर्गिकेखलील पृष्ठभागाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी फाटक पाच दिवस बंद असणार असल्याची माहिती पत्रिपत्रक काढून जाहीर केली जाते आणि तरीदेखील फाटक बंद केले जात नाही, याबद्दल वाहनचालक पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यानंतर आपला संताप व्यक्त करतात.