काश्मिरच्या धर्तीवर सीमाभाग केंद्रशासित करा

आ.जयंत पाटील यांची मागणी, सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण
| नागपूर | दिलीप जाधव |
काश्मीरचे विभाजन करून तीन वेगवेगळी राज्ये करून ती केंद्रशासित केली. त्याच धर्तीवर गेली 66 वर्षे सुरु असलेला महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्‍नाचा तिढा सुटेपर्यंत हा वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करा, अशी जोरदार मागणी शेकाप आ.जयंत पाटीलयांनी बुधवारी ( 28 डिसेंबर) विधान परिषदेत केली.

सीमा वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने असे काही म्हटले नाही की, तुम्ही हा वाद सामंजसाने सोडवू नका.केंद्रात भाजपचे सरकार आहे. लोढ़ा साहेब तुम्ही आपले वजन वापरा आणि हा प्रश्‍न कायमचा सोडवा अन्यथा दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षीय आमदारांनी दिल्हीत जाऊन सत्याग्रह करुया आणि हा वाद कायमचा सोडवू या
आ. जयंत पाटील

आ. जयंत पाटील बुधवारी सभागृहात पोटतिडकीने बोलत होते. सीमा भागातल्या गावात राहणार्‍या मराठी भाषिकांवर अन्याय केला जाता. या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समितीचे तसेच संयुक्त महाराष्ट्र संघर्ष समितिचे नेते स्व. मधु दंडवते ,मधु लिमये ,उद्धवराव पाटील, शेकाप दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, प्रा.एन .डी.पाटील, गणपतराव देशमुख,नथुराम पिंगळे,बाबूराव ठाकूर,, दाजिबा देसाई बॅ. नाथ पै, नंतरच्या पिढीत मीनाक्षी पाटील, बेळगावचे किरण ठाकूर आदींनी हा लढा दिला आहे. या लढ्यात बेल्लारीच्या तुरूंगात दत्ता पाटील हे आठ महिने तुरूंगात होते.त्यावेळी मी 8 वर्षाचा होतो.आज 67 वर्षाचा झालो तरी हा वाद संपुष्ठात आला नाही.

हि सीमावासियांची चेष्टा असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या लढ़यात आम्हीपण सामिल झालो होतो. आमचीही डोकी फुटली आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले आहेत. त्यातील 5 हुतात्मे हे बेळगाव मधील होत. आजची परिस्थिति बघूनत्या हुताम्यांना काय वाटले असेल अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. त्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीचे 9 आमदार होते. त्यात 5 आमदार शेकापचे पाच आमदार होते. मात्र नंतरच्या काळातल्या निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पाडण्यात आले. आज एकही आमदार एकीकरण समितिचा नाही.अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


सत्तेच्या परिघाने भाषा बदलली
सीमा वादावर 2006 , 2011 ,2014 आणि आता चौथ्यांदा ठराव पारीत करण्यात आला आह. हे काय चटावरचे श्राद्ध आहे का ? या ठरावावर अगोदर चर्चा व्हायला पाहिजे त्यानंतर ठराव पारित केला पाहिजे,अशी विचारणाही त्यांनी त्यांनी सत्ताधार्‍यांना केली. तुम्ही सत्तेच्या परिघात गेलात की तुमची भाषा बदलते. यापूर्वी या ठरावावर स्व.मुख्यमंत्री विलासराव देशमुख,स्व .गोपीनाथ मुंडे, एकनाथ खड़से,आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते. मात्र आता याबाबत आपल्या सर्वांची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांकड़े बैठक होउन सुद्धा महाराष्ट्राच्या विरोधातला ठराव करतात याबाबतही जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटक राज्य सोडून इतर कुठल्याही राज्यांनी सीमावाद उभा केला नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Exit mobile version