तळे केंद्रात शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू

| तळे | वार्ताहर |

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा राज्यात 21 फेब्रुवारीपासून सर्वत्र सुरू झाल्या असून तळा केंद्रातही त्या सुरू झाल्या आहेत.

तळा केंद्रात एकूण 211 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. यात कला विभाग 58, वाणिज्य विभाग 71 आणि विज्ञान विभाग 79 तर पुर्ण परिक्षार्थी 3 असे एकूण 211 विद्यार्थी परिक्षा केंद्रावर आहेत. परिक्षा सुरळीत जाण्यासाठी केंद्रप्रमुख ईश्वर बोळेगावे जातीने लक्ष देत आहेत. त्यांना सहकार्य टी.एन. भुरे, किरण नागावकर, स्वप्निल वरंडे, प्रसाद सुतार, हरिश्चंद्र काणेकर, प्रकाश जाधव हे कर्मचारी मदत करीत आहेत. नऊ वर्ग खोल्यांतून बैठक व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त परिक्षा केंद्रावर ठेवलेला आहे.

दरम्यान, चंद्रकांत रोडे, माधुरी घोलप, पुरुषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महादेव बैकर, दिलीप ठाकणे, चंद्रकांत भोरावकर, डॉ. नानासाहेब यादव यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version