छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

खालापूर तालुक्यात जांबरुग येथून प्रारंभ

| खोपोली | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्रमांक.1 ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात दि.7 मार्च ते 15 मे दरम्यान मंडळ स्तरावर एकूण 7 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. खालापुर तालुक्यातील जांबरुग येथील रा.जि.प शाळेत शनिवारी (दि.7) या अभियानाचा शुभारंभ तहसीलदार अभय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी तहसीलदार अभय चव्हाण, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग, नायब तहसीलदार विकास पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे, विस्तार अधिकारी विनोद चांदोरकर, जांबरूगचे सरपंच शिल्पा खांडेकर, बीडचे सरपंच भाऊ पवार, माजी सभापती मालती खांडेकर, माजी उपसरपंच सचिन तांडेल, सुवर्णा पाटील, संदेश कांबळे, प्रशांत खांडेकर मंडळ अधिकारी संदेश पानसरे, ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा कोल्हे, शैला गवळी, किरण लोखंडे, सचिन किर्तत, आशिष राऊत, सहाय्यक महसूल अधिकारी दिपाली पवार, महसूल सहाय्यक पल्लवी रामटेके, सचिन वाघ, अमोल वाघ, आकाश माने, राम पवार, भूमी अभिलेख अधिकारी उत्तम केंद्रे, समाधान पाटील, अरविंद खांडेकर, कैलास शेंडगे, उज्वल कोळेकर, भाऊसाहेब मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष पवार, सखुबाई कुडाळे, चंद्रकांत पाटोळे, तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आधार कार्ड केंद्र चालक व इतर कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यासह जिल्ह्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगर पंचायत पातळीवर ‌‘छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियान टप्पा 1’चे आयोजन दि.7 मार्च ते 15 मे या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी द्वारा सेवा पुरविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी खालापूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रशासकीय विभागाकडील अधिकारी यांनी आपापल्या विभागाकडील योजनांची माहिती दिली. तसेच, स्टॉल लावून शासनाच्या विविध प्रकारचे दाखले व योजना नागरिकांना लाभ देण्याकरिता सोय उपलब्ध करून माहिती दिली. या अभियानात तालुक्यातील नागरिकांनी विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेतला.

महसूल विभागाच्या सेवा
प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे
7/12 मधील चुकांची दुरुस्ती
डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा 8‌‘अ' वाटप
उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी आदिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा (42 ते 47) कलम सनद प्रक्रियेची माहिती
सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभ मंजुरी
विद्यार्थ्यांना दाखले वाटप
तुकडेबंदी कायदा सुधारणा
पानंद रस्ता
सर्वांसाठी घरे पट्टेवाटप
ॲग्रीस्टॅग नोंदणी
पी एम किसान नोंदणी
कमी जास्त पत्रक दप्तर अद्यावत
भूमी अभिलेख यांच्याकडील सेवा
डिजिटल सेवांचा प्रसार व जनजागृती
नगर भूमापन गावठाण भूमापन व स्वामित्व अंतर्गत फेरफार प्रकरणे
भूसंपादन व अकृषीक प्रकरणात कमी जास्त पत्रक तयार करणे
ई मोजणी 2.0 प्रणाली
महाभुमी पोर्टल विषयी जनजागृती
तुकडे बंदी कायद्यामधील बदल बाबत माहिती
जनसंपर्क व प्रात्यक्षिक उपक्रम

    सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभाग आणि इतर विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडवणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे हा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

    -अभय चव्हाण,
    तहसीलदार

    Exit mobile version