| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
69 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सहा ग्राम वजनाची सोन्याची चेन खेचून तिघेजण स्कुटीवरून पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी (दि.28) तिघांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगीता वानखेडे या कामोठे, सेक्टर 21 येथे राहात असून, शुक्रवारी सकाळी त्या सेक्टर 21 येथून वॉकिंगला गेल्या. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगकडून जेएनपीटी रोड कडे त्या गेल्या. यावेळी सिल्वर रंगाच्या स्कुटी वरून तीन तरुण हे त्यांच्या मागेपुढे करत होते. यावेळी सेक्टर 25 मधून चालत जात असताना त्यांनी स्कुटी थांबवली आणि त्यांनी वानखेडे यांच्या गळ्यातील सहा ग्राम वजनाची सोन्याची चेन जोरात ओढली आणि ते कळंबोली सर्कलच्या दिशेने निघून गेले. यात वानखेडे यांच्या मानेला झटका बसून दबल्याने मानेला मार लागला.
ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चेन लंपास
