कसळखंड प्रकल्पग्रस्तांचा साखळी उपोषण सुरु

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा जाहीर पाठिंबा

| रसायनी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मेसर्स कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडिया लि.मु.पौध पो.माजगाव व मेसर्स आष्टे लॉजिस्टिक्स प्रा.लि. कसलखंड या कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गेले तीन दिवसांपासून श्रमिक संघाच्या कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुण हे साखळी उपोषणाला बसले आहेत.

मे कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडिया लि. या कंपनीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांना नाहक त्रास दिला जातो तो त्रास थांबला पाहिजे व कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होऊन करार झाला पाहिजे तसेच मे. आष्टे लॉजिस्टिक्स प्रा.लि. या कंपनीमधील स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले गेले आहे.त्यांना पुन्हा कामावर घेऊन कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होऊन करार झाला पाहिजे.आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत.परंतु कंपनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्याच अनुशंघाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी स्थानिक उपोषण कर्त्यांची भेट घेतली व जाहीर पाठिंबा दिला.

मनोहर भोईर यांनी सर्व उपोषणकर्त्यांना अश्वस्थ केले कि, शिवसेना तुमच्या सोबत आहे. आज सर्वच क्षेत्रातील कामगारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे शिवाय वाढती महागाई व बेरोजगारी हा सर्वांत मोठा प्रश्न या महाराष्ट्रासमोर व देशासमोर आहे असे देखील शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरभोईर यांनी सांगितले .

Exit mobile version