| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून गहाळ झालेले 48 मोबाईल मूळ मालकांस परत केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अनुरूध्द गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोहवा महेश धुमाळ, सुनील कुदळे, भिमराव खताळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सीईआयआर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतील सन 2025 माहे मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 48 मोबाईलचा सीईआयआर पोर्टलद्वारे शोध घेऊन विविध राज्यांतून अंदाजे 5,76,000/-रुपये किमतीचे एकूण 48 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. हस्तगत केलेले मोबाईल फोन हे तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहेत.