| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील कोणताही एक संघ रविवारी (दि.13) मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी-20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी उचलेल. ही ट्रॉफी जिंकण्याबरोबरच यावेळी विजेत्या संघावर पैशांचा पाऊसही पडणार आहे. एवढेच नाही तर, उपविजेत्या संघालाही मोठी रक्कम देण्यात येणार आहे.
विजेतेपद जिंकणार्या चॅम्पियन संघाला 1.6 दशलक्ष यूएस डॉलर्स म्हणजेच तब्बल 13 कोटी रुपयांचे पारितोषिक तर उपविजेत्या संघाला याच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होणार्या दोन्ही संघांना 4-4 लाख अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.
बक्षिसांची खैरात
विजेता- 13 कोटी
उपविजेता- 6.42 कोटी
सेमीफायनल- 3.26 कोटी
सुपर-12 मधील विजय- 32 लाख
सुपर-12 मधून बाहेर होणारे- 32 लाख
पहिल्या फेरीतील विजय- 32 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर होणारे- 32 लाख