छावा क्रांतिवीर सेनेच्या पाठपुराव्याला यश
। बोर्लीपंचत । वार्ताहर ।
पनवेल येथे झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी नामकरण करण्यात आले आहे. याबाबत छावा क्रांतिवीर सेनेने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. रायगड जिल्हाध्यक्ष रोशन पवार, उपजिल्हाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, संपर्क प्रमुख स्वप्नील घरत, कोकण विभाग प्रमुख अनंत कोंदविलकर यांनी रुग्णालयाचे लवकरात लवकर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी नामकरण करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे सरकारकडे केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला होता.
त्याचबरोबर दि.31 आक्टोबर रोजी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारातही छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. त्यानूसार रुग्णालय प्रशासनाने त्यावर तातडीने अंमलबजावणी करुन उपजिल्हा रुग्णालयाचे महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी असे नामकरण केल्याने श्री सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.