चांदे आदिवासीवाडी शाळेला नवे रूप

| माणगाव | प्रतिनिधी |

पोस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लि. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत राजिप शाळा चांदे आदिवासीवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, संपूर्ण रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज शौचालयाचे बांधकाम, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली. या विकासकामांमुळे शाळेला आकर्षक व सुशोभित स्वरूप प्राप्त झाले आहे. तर विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात निजामपूर बीट विस्तार अधिकारी संजय पालांडे, केंद्रप्रमुख महादेव बांगर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कविता वालेकर, सदस्य दत्तात्रय पवार, मुख्याध्यापिका नम्रता बडे, उपशिक्षिका प्रतीक्षा होवाळ, अंगणवाडी सेविका चंद्रा पवार, स्वयंपाकी शुभांगी शिंदे, पालक, ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version