चंद्रकांत ठाकूर यांचे निधन

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील उडदवणे येथील ज्येष्ठ शेकाप कार्यकर्ते चंद्रकांत तुकाराम ठाकूर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रकांत ठाकूर यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा,2 मुली असा मोठा परिवार असून त्यांच्या अंतिम संस्काराप्रसंगी स्थानिक सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे उत्तरकार्य 27 जानेवारी रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती वरसे जि.प मतदारसंघाचे चिटणीस खेळू ढमाल यांनी दिली आहे.

Exit mobile version