अँजेला मर्केल पराभवाच्या छायेत
बर्लिन | वृत्तसंस्था |
जर्मनीमध्ये रविवारी संसदेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सोशल डेमोक्रेटिक पक्षाला सर्वाधिक जागा मिळत आहेत. मर्केल यांच्या पक्षाला 2005 नंतर मोठा झटका बसला असून हा पक्ष नेतृत्व करण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. यामुळे मर्केल यांची 16 वर्षांची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
सेंटर लेफ्ट सोशल डेमोक्रेटिक (एसपीडी) ला 25.5 टक्के मते मिळाली असून मर्केल यांच्या सीडीयू, सीएसयू कंझर्व्हेटीव्ह आघाडीला 24.5 टक्के मते मिळाली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नसून नवीन सरकार सत्तेत येण्यासाठी आघाडी करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये ग्रीन्स आणि लिबरल फ्री डेमोक्रेटिक (एफडीपी) सहभागी होण्याची शक्यता आहे.