विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात बदल


फुटबॉल १६ गटात होणार सामने
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तर अमेरिकेत होणार्‍या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात मोठा बदल करण्यात आला आहे. फिफाच्यावतीने एक निवेदन जारी करण्यात आले असून, 4-4 संघांचे 12 गट असणार आहेत. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती.नव्या नियोजनानुसार प्रत्येक संघाला विश्‍वचषकामध्ये किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळेल आणि हे सर्व सामने पुरेशा विश्रांतीसह खेळवल्या जातील.

विशेष म्हणजे स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 संघ सहभागी होत होत्या, ज्यांची 8 ग्रुपमध्ये विभागणी केली जायची. तर त्या प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ होते आणि ग्रुपमधील 2 टीम टॉप-2 नॉक आऊट स्टेजमध्ये पोहोचायच्या. पण आता नव्या फॉरमॅटनुसार, पुढच्या फिफा स्पर्धेत एकूण 48 टीम सहभागी होणार असून त्यांची विभागणी 12 ग्रुपमध्ये केली जाणार आहे.
कसा असेल नवा फॉरमॅट?

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार्‍या या स्पर्धेसाठी फिफाने सुरुवातीला 3-3 संघाचे चार गट तयार करण्याचं ठरवलं होतं, त्यापैकी प्रत्येक गटातून दोन संघ नॉक आऊट स्टेजमध्ये पोहोचायच्या. रवांडाची राजधानी किगाली येथे पार पडलेल्या बैठकीनंतर 4-4 संघ गटामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत टॉप -2 टीमसह, बेस्ट-8 थर्ड प्लेस टीम अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तिथूनच नॉक आऊट स्टेजला सुरुवात होईल.
नव्या आयोजना नुसार, आता फिफा वर्ल्डकपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत.उपांत्यफेरी आणि फायनल्समध्ये पोहोचणार्‍या संघांना 8-8 सामने खेळावे लागतील. आतापर्यंत 64 सामने खेळले गेले आहेत.

अमेरिकेतील जास्तीत जास्त 11 शहरांना हे सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. यानंतर मेक्सिकोची तीन शहरं आणि कॅनडाची दोन शहरंही विश्‍वचषकाचे सामने आयोजित करणार आहेत. अमेरिकेत अटलांटा, बोस्टन, डॅलस, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को आणि सिएटल येथे विश्‍वचषकाचे सामने होणार आहेत. विश्‍वचषकाचे सामने मेक्सिकोतील ग्वाडालजारा, मेक्सिको सिटी आणि मोंटेरी आणि कॅनडातील टोरंटो आणि व्हँकुव्हर येथे होणार आहेत.

Exit mobile version