ऑक्सिजनच्या मुद्यावरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिला असल्याचं केंद्र सरकारने संसदेत जाहीर केलं होते. यावरुन बुधवारी प्रचंड गदारोळ निर्माण झाला.काँग्रेस,शिवसेनेवर यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केलं. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचंही केंद्र सरकारने सांगितलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ही 3095 मेट्रिक टन इतकी होती. ती दुसर्‍या लाटेत 9000 मेट्रिक टन इतकी झाल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही या केंद्र सरकारच्या उत्तरावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे.

ऑक्सिजन अभावी देशात हजारो मृत्यू झाले असून ज्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे त्यांनी केंद्र सरकारवर खटला दाखल करावा
संजय राऊत ,शिवसेना खासदार

गडकरींचा व्हीडीओ व्हायरल
ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचा सरकारचा दावा खोडून काढणारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी असे म्हणतात की, ङ्गकोविडच्या या काळात आपल्या देशातील अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.

Exit mobile version