संमेलनाध्यक्षपदी चपळगावकर

। वर्धा । वृत्तसंस्था ।

वर्धा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मंगळवारी प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यात विविध घटक संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. त्यातून न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश द. वंसकर, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व कार्यकारिणी सदस्य तसेच, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version