आक्षी समुद्रकिनारी सापडले चरस

| अलिबाग | प्रतिनिधी |

श्रीवर्धननंतर मुरुड आता अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी चरसची पाकीटे सापडू लागले आहेत. आक्षी येथील समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी चरसची सहा पाकीटे सापडली आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. किनारी सापडलेली चरसची पाकीटे ताब्यात घेऊन त्यांचे वजन करणे, पंचनामे करणे आदी प्रक्रीया करण्यात आली आहे. या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने पोलीसांनी अधिक सतर्क राहण्याचा इशारा स्थानिकांना दिला आहे. कोणाला अशा प्रकारची पाकीटे दिसून आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार करीत आहेत.

Exit mobile version