| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेच्या नवीन इमारतीचा वापर करण्यास गणेश चतुर्थीचा मुहूर्त गाठण्यात येणार आहे. येत्या अठरा सप्टेंबरपासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशीच कामकाज जुन्या वास्तूत होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरपासून म्हणजे गणेश चतुर्थीपासून अधिवेशन नवीन संसद इमारतीत भरेल.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तारखा जेव्हा जाहीर झाल्या, तेव्हा हे अधिवेशन गणेशोत्सवाच्या काळात का होतंय यावरुन खासदारांनी टीका केली होती. त्यातही महाराष्ट्रातल्या खासदारांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे हा सवाल उपस्थित होत होता. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन २८ मे रोजी करण्यात आलं. पण संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाज मात्र जुन्याच इमारतीतून झालं होतं.