चौल-भोवाळे यात्रेचा आजच शेवट

Photography by Santosh Raul

उद्या दत्तयात्रा नाही

| चौल | प्रतिनिधी |

चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्तयात्रा थर्टी फर्स्टच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पाच दिवसच भरविण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती चौल ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित गुरव यांनी दिली.

चौलच्या यात्रेला मंगळवार,  दि. 26 डिसेंबरपासून प्रारंभ झाला. दरवर्षी याठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते. आज शनिवारी यात्रेचा शेवटच दिवस आहे. उद्या रविवार असल्या कारणाने यात्रा भरेल, असा अंदाज भाविकांकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु, तो फोल ठरला. रविवारी साजरा होणार्‍या थर्टी फर्स्टच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव यात्राकाळ न वाढविण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला असल्याची माहिती उपसरपंच अजित गुरव यांनी दिली. त्यामुळे उत्साही यात्रेकरूंच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. नोकरी-धंद्यानिमित्त ज्यांना पाच दिवसांत यात्रेत येणे शक्य झाले नाही, त्यांनी रविवारी यात्रेत येण्याचा बेत केला होता, परंतु यात्रा भरणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

Exit mobile version