सुरेंद्र म्हात्रेंच्या रूपाने विकासाचा खरा चेहरा समोर
| अलिबाग | प्रतिनिधी |
सतत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणारे, स्वतःच्या अधिकारक्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या कामांचे खोटे श्रेय घेणारे, तसेच गेली 40-50 वर्षे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना आजूबाजूची जागा विकत घेऊन जेसीबी लावून घरे पाडण्याच्या धमक्या देणारे नेतृत्व चौलकरांना नको आहे. चौलची जनता स्पष्टपणे निष्ठा, काम आणि माणुसकीच्या बाजूने उभी आहे. हजारो बेघर नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणारे, अनेक गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर बांधून देणारे, ऐतिहासिक वारसा जपत चौलमधील मंदिरे, प्रत्येक गल्लीतील रस्ते, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून घरोघरी नळयोजना राबवणारे आणि कुणाच्याही अडचणीत अर्ध्या रात्री मोठ्या भावासारखे धावून जाणारे नेतृत्व म्हणजेच सुरेंद्र म्हात्रे.
पाच वर्षांपूर्वी चौलकरांनी सुरेंद्र म्हात्रे यांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून दिले, तीच विकासाची आणि विश्वासाची परंपरा अखंड ठेवण्याचा निर्धार आज जनतेतून व्यक्त होत आहे. सध्या काहीजण आग्राव रस्त्याचे श्रेय घेऊन मतांची मागणी करत असले, तरी हा रस्ता तसेच मतदारसंघातील विविध विकासकामे शासन दरबारी पाठपुरावा करून, लेखी प्रस्ताव व प्रत्यक्ष भेटींद्वारे मंजूर करून घेण्याचे काम सुरेंद्र म्हात्रे यांनीच केले आहे, हे वास्तव जनतेला माहीत आहे.
पाच वर्षे सत्तेच्या जवळ राहून सर्व सुविधा उपभोगणारे, बंगले बांधण्याच्या परवानग्या घेणारे आणि निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्याने टाकलेली हाडे चघळत आता टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या भूमिकेकडे पाहावे, असा थेट सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमदारकीची उमेदवारी सोडणारे कुठे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पक्षाने मोठे केले त्या पक्षाला संकटात असताना सोडून जाणारे कुठेहा फरक जनता स्पष्टपणे ओळखते.
चौलची जनता सुज्ञ आहे. निष्ठावान कोण आणि संधीसाधू कोण, हे ती चांगल्या प्रकारे जाणते. त्यामुळे कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता योग्य तो निर्णय चौल जिल्हा परिषद मतदार संघातील जनता नक्कीच देईल. निवडणुकीपुरते नव्हे, तर चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध असणाऱ्या, विकास आणि विश्वासाचे प्रतीक ठरलेले सुरेंद्र म्हात्रे यांना पुन्हा संधी द्यावी, असा ठाम कौल जिल्हापरिषद मतदार संघातील जनता देत आहेत.






