चव्हाण यांचा सेवापुर्ती समारंभ


। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विश्‍वास चव्हाण यांनी 1992 पासून महाविद्यालयात रुजू झाल्यापासून हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून आज ते विद्यार्थी चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत.त्यामुळे तालुक्यात आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच, जुनी पेठ येथील विठ्ठल मंदिराचा जिर्णोदर त्यांच्या सहभागातून झाला आहे. हे मंदिर रजिस्टर करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मनोज भगत यांनी डॉ. विश्‍वास चव्हाण यांच्या सेवापुर्ती समारंभा कार्यक्रमावेळी बोलत होते.

यावेळी मुश्ताक अंतुले, डॉ. विश्‍वास चव्हाण, आर.सी.घरत, अशोक तळवटकर, सुभाष महाडिक, वृषाली चव्हाण, डॉ.नारायण बागुल, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ. श्रीशैल बहिरगुंडे, अ‍ॅड. इस्माईल घोले, अजित कासार, आदेश दांडेकर, फजल हलडे, अब्दुल घनसार, डॉ. साजिद शेख, रियाज ढाकम, नाना गुरव, वासंती उंमरोटकर, दिगम्बर टेकले, इस्माईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version