| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय व क्रिस्टल आय सेंटर माझगाव-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.3 डिसेंबर रोजी मुरुडमध्ये सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मावाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत होणार्या या शिबिराचे उद्घाटन कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक, अॅड. इस्माईल घोले, वासंती ताई उमरोटकर, आरती गुरव-जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.ए. नागरबावडी, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
गरजूंनी डॉ नागरबावडी 8050521300, डॉ. विश्वास चव्हाण 8668221240, डॉ. श्रीशैल भैरगुंडे 8698338181, डॉ. गजानन मुनेश्वर 98811985340, संदेश दांडेकर 8446534884 यांच्याशी संपर्क साधावा.