। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोलीमध्ये एका महिलेची पैसे मोजण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कळंबोली सेक्टर 3 मध्ये राहणारी महिला कार्यालयात जाण्यासाठी अभ्युदय बँकेच्या बसस्टॉपवर उभ्या होत्या. त्यावेळी अज्ञात दोन व्यक्तींनी तेथे येऊन त्यांच्याकडील पैसे मोजून देण्याचा बहाणा करून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे 37 हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले. याविषयी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.