। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूर, इचलकरंजी येथील टेक्साटाईल पार्कमधील विजेत प्रॉडक्ट्स प्रायव्हेट केमिकल कारखान्याला लागली आग आहे. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे शेजारी असणार्या यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी सापडला आहे. कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाख झाल्या असून आग विझविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला जात आहे. या आगीत दोन कोटीपर्यंतच नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इचलकरंजी शहरात मोठ्या यंत्रमाग कारखाने आहेत. त्यामुळे या कारखान्याला लागलेल्या आगीमुळे शेजारी असणार्या यंत्रमाग कारखान्याना या आगीचा धोका पोहचू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी सकाळी अचानक कशामुळे आग लागली याची चौकशी करण्याचे कामही सुरू आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारी असलेल्या यंत्रमाग कारखाना मालक भीतीच्या छायेखाली आहेत.
इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या आगीचा इतर यंत्रमाग व घरांना धोको पोहचू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानातकडून प्रयत्न केले जात आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. केमिकल फॅक्टरीला आज सुट्टी असल्यामुळे फॅक्टरी बंद होती. त्यामुळे आगीज कोणतीही जीवितहानी झाली नाही.