माणगावात विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धा

| माणगाव | प्रतिनिधी |

देशपांडे चेस अकॅडमीतर्फे माणगाव येथील एस.एस.निकम इंग्लिश स्कूल याठिकाणी बुधवारी (दि.12) दुपारी 12 वाजता माणगाव व तळा तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दोन्ही तालुक्यांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

माणगाव व तळा या दोन तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी होणारी ही बुद्धिबळ स्पर्धा गट अ  इयत्ता 1 ली ते 4 थी व गट ब इयत्ता 5 वी ते 8 वी अशा दोन गटांत होणार असून, स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 100 रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्र. 750 रु. व चषक, द्वितीय क्र. 500 रु. व चषक, तृतीय क्र. चषक, चतुर्थ क्र. चषक, पाचवा क्र. चषक, उत्कृष्ट मुलगी चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेणार्‍या इयत्ता 1ली ते 4थी मधील विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सीआयएस राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक किशोर देशपांडे 8888250234 यांच्याकडे संपर्क साधावा.

Exit mobile version