चेतन पाशिलकरचा सन्मान

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
फ्रान्समध्ये झालेल्या 10 व्या इंटरनॅशनल एबीलिंपिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक पटकावून दिलेल्या दिव्यांग चित्रकार चेतन पाशीलकर यांचा पाली नगरपंचायतीने सन्मान केला. यावेळी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत अधिकारी व कर्मचार्‍यांनी चेतनवर फुलांचा वर्षाव केला. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पाली नगरपंचायत नगराध्यक्षा प्रणाली शेळके, मुख्याधिकारी विद्या येरूनकर, कल्याणी दपके, जुईली ठोंबरे, मधुरा वरंडे, सुधीर भालेराव, सचिन जवके, सुलतान बेनसेकर व सुमेध खैरे यांच्यासमवेत चंद्रकांत पाशिलकर, श्रीयोग पाशिलकर आदींसह पाली नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version