छापा टीझर व्हिडिओ प्रदर्शित

प्रशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती, अलिबागच्या कलाकारांची नव निमिर्ती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

भन्नाट इंटरटेंटमेंट प्रेझेंट्स, संदीप वाटवे फोटो आणि फिल्मस प्रॉडक्शन अलिबागच्या कलाकारांचा सहभाग असलेली आणि सागर यादव यांनी दिग्दर्शित केलेली भविष्यातील चित्रपट छापाचा टीझर व्हिडिओ अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी सायंकाळी चेंढरे येथे प्रदर्शित झाला.

या प्रसंगी माजी राजिप सदस्य संजय पाटील, माजी राजिप सदस्य प्रियदर्शनी पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, अदिती नाईक-दळवी, अलिबागचे कलाकार ज्यांची या मध्ये प्रमुख भूमिका आहे असे अंकिता राऊत, प्रतीक पानकर, संदीप वाटवे, योगेश अग्रावकर, प्रकाश सप्रे, सचिन शिंदे, पूनम म्हात्रे, मृणाली कांबळे, प्रमोद गुरव, गौरव दळी, प्रशांत कांबळी, सुनीत गुरव, विशाल गायकवाड, मनिष आंसूरकर, वैभव पडवळ, सिधांत पाटील, कुणाल त्रिलोटकर, सुभम पानपाटील, रसिक म्हात्रे, अनिरुद्ध थळेकर, जय पेडणेकर, अमित पाटील, लक्ष्मी मुकादम आणि कृष्ण वाटिका सोसायटीतील रहिवासी यांच्या उपस्थितीत छापाचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित झाला. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्रतिम सुतार यांनी केले.

Exit mobile version