| अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात छटपुजा साजरी करण्यात आली आहे. 28 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या छठपूजेच्या तिसर्या दिवशी निर्जल उपवास करणारे उत्तर भारतीय नागरिक मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी उपस्थित असल्याचे शिवा यादव यांनी सांगितले. जिल्ह्यात छटपुजा उत्साहात साजरी करण्यासाठी प्रशासनानेही चांगले सहकार्य केले. छटपुजा मांडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती, त्याचबरोबर पाण्यात उभे राहून सुर्य अर्घ्य देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीही प्रशासनाना सुरक्षेची विशेष व्यवस्था केली होती.
शेकाप करंजाडेकडून छटपूजेचे आयोजन
| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष करंजाडेच्यावतीने सरपंच रामेश्वर आंग्रे व उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने करंजाडे परिसरात वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी सहकुटुंब हजेरी लावून करंजाडे नदीवर दुग्धाभिषेक अर्पण करत सूर्याला अघ्र्य देऊन विधिवत छटपूजा केली. यावेळी उसळलेल्या आबालवृद्धांच्या गर्दीने संपूर्ण परिसरात भक्तिमेळा फुलला होता. उत्तर भारतात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या संध्येला मोठया जल्लोषात मकार्तिकी छटपूजाफ साजरी केली जाते
यावेळी कोकण शिक्षक मतदार संघांचे आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, मंगेश बोरकर यांच्यासह कार्यकर्ते, सदस्य महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
पाताळगंगा नदीवर छट पुजा
| पाताळगंगा। प्रतिनिधी |
उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पाताळगंगा नदिच्या ठिकाणी छटपूजा करण्यात आली. यामुळे पाताळगंगेचा संपूर्ण परिसर उत्तर भारतीयांमुळे गजबजून गेल्यांचे पहावयास मिळाले. महिलांची त्यांच्या कुटुंबासमवेत छट पुजा करण्यासाठी गर्दी केली. नदीतीरावर छटपूजेसाठी महिलांनी उसाचे चौरंग मांडून पूजा करुन नदी पात्रात दिवे सोडण्यात आले.
सुकेळी परिसरात छटपुजा
| सुकेळी । वार्ताहर ।
व्यवसायानिमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात बिहार , झारखंड, उत्तर प्रदेश या ठिकाणचे रहिवासी असलेले अनेक परप्रांतियानी सुकेळी परिसरात अनेक महिलांनी (दि.30) रोजी सायंकाळी सुर्यास्ताच्यावेळी जिंदाल कंपनीच्यामागे असलेल्या नदिकिनारी गंगापुजन केले. त्यानंतर दुसर्या दिवशी (दि.31) रोजी पहाटे नदिवर जाऊन पुजा केल्यानंतर सुर्योदयाचे दर्शन घेऊन महिलांनी छटपुजेचा उपवास सोडवुन छटपुजा साजरी केली.