चिरनेर गावात साकारणार छ. शंभू राजांचा इतिहास

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| चिरनेर | प्रतिनिधी |

छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी, ग्रामस्थ मंडळ चिरनेर कातळपाडा, छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 369 वी जयंती चिरनेर कातळपाडा येथील दत्त मंदिराच्या भव्य प्रांगणात गुरुवारी (दि.14) साजरी करण्यात येणार आहे. सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी मेहनत व तितक्याच कलाकारांच्या योगदानातून शंभूचरित्र व मिरवणुकीच्या माध्यमातून छ. शंभू राजांचा पराक्रम आणि इतिहास साकारला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवात संभाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक, महिला लेझीम पथक, ढोल-ताशा, फेट्यांचा थाट तसेच शिवचरित्रावर आधारित द्विहृदयी गजानन पाटील ही बालिका भव्य शिवगर्जना सादर करणार आहे, अशी माहिती छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुभाष कडू यांनी दिली. तर पालखी मिरवणूकीत प्रशांत घरत हे अश्व नृत्याचे खेळ करून दाखविणार आहेत.

Exit mobile version