छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धा

अवनीश-अद्विक इलेव्हन संघ अजिंक्य
| पोलादपूर | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त तालुक्यातील साखर ग्रामस्थ मंडळाने जय भवानी क्रिकेट क्लबने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या भव्य ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अवनिश विकासशेठ गोगावले संघाने 2 लाख रूपयांच्या बक्षिसासह छत्रपती शिवाजी महाराज चषक साखर पोलादपूर 2023 पटकावला. या स्पर्धेमध्ये क्रिकेटपटूंनी 16 खुली संघ पारितोषिके आणि 24 असोसिएशन संघ पारितोषिके यांची अक्षरश: लयलूट केली.

तालुक्यात शिमगोत्सव, शिवजयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोठया संख्येने आलेल्या चाकरमानी आणि स्थानिक मंडळींनी भव्य क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती दर्शवित गर्दी केली होती. यामुळे क्रिकेटपटूंच्या उत्साहाला प्रोत्साहनामुळे उधाण आलेले दिसून येत होते. गोलंदाजांनी मिळविलेल्या विकेटसला, क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या कॅचेसना आणि फलंदाजांनी मारलेल्या चौकार षटकारांना, उत्स्फूर्तपणे बक्षिसे देऊन चाकरमान्यांसह स्थानिकांनी प्रोत्साहन दिले. 10 मार्चपासून सुरू झालेल्या या भव्य ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर, युवा सेना कोअरकमिटी सदस्य विकासशेठ गोगावले,युवक काँग्रेसचे नेते श्रेयस माणिकराव जगताप, चंद्रकांत कळंबे, अनिल दळवी, कृष्णा कदम तथा के. के., लक्ष्मण मोरे, विनायक दिक्षित, सिध्देश शेठ, नरेश सलागरे, राकेश उतेकर आणि मेघना भोसले आदींनी भेट देऊन क्रिकेटपटूंना प्रोत्साहन दिले.

अवनिश विकासशेठ गोगावले इलेव्हन या विजेत्या संघास 2 लाख रूपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक साखर पोलादपूर 2023 आणि उपविजेत्या क्रियांश इलेव्हन संघास 1 लाख रूपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक साखर पोलादपूर 2023 तर ओपन गटातील मालिकावीर मयूर वाघमारे (9 विकेट) अवनिश इलेव्हन, उत्कृष्ट फलंदाज सलमान शेख (50 धावा) क्रीयांश इलेव्हन, उत्कृष्ट गोलंदाज तानाजी (7 विकेट) क्रियांश इलेव्हन तसेच असोसिएशनतर्फे 30 हजार रूपये प्रथम पारितोषिक आणि भव्य चषक मुजम्मील तांबे वावे इलेव्हन संघास, द्वितीय पारितोषिक 20 हजार रूपये प्रथम पारितोषिक आणि भव्य चषक भैरवनाथ देवळे संघास, तृतीय पारितोषिक 10 हजार रूपये प्रथम पारितोषिक आणि भव्य चषक आदर्श क्रीडा मंडळ निवे संघाला प्रदान करण्यात आले. असोसिएशनतर्फे मालिकावीर आशिष कोळसकर (84 धावा 6 विकेट) देवळे, उत्कृष्ट फलंदाज अर्सनाल (56 धावा) वावे इलेव्हन, उत्कृष्ट गोलंदाज मतिन (7 विकेट) वावे इलेव्हन अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रत्येक सामन्यात सामनावीर पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये ट्रॉफी, स्पोर्टस शूज, स्पोर्टस सायकल तसेच अन्य बक्षिसांचा समावेश आहे.

याप्रसंगी हरिश्‍चंद्र बाबा मोरे, अवनिश विकास गोगावले, शैलेश पालकर, श्रावणी कोळसकर, रामचंद्र कदमशेठ, संदीप कदम, तुकाराम मोरे, कविता दशरथ चोरगे, मनोहर जाधव, सुदर्शन खेडेकर, सुधीर चोरगे, रामचंद्र हनवती मालुसरे आदींचा विशेष सत्कारदेखील आयोजकांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक भरत चिमा चोरगे, नारायण चोरगे, नारायण तांदळेकर, लक्ष्मण तांदळेकर, मिलींद मालुसरे, जयराम बांद्रे, दशरथ चोरगे, किसन सुरवसे, हनवती चोरगे, नामदेव तांदळेकर, प्रभाकर पवार तसेच जय भवानी स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष संजय चोरगे व पदाधिकारी भरत का.चोरगे, संगेश बांद्रे, नितेश मालुसरे, प्रसाद तांदळेकर, रूपेश चोरगे, सल्लागार संदीप कदम, सुनील मालुसरे, गणपत चोरगे, प्रमोद कांबळे, पंढरीनाथ मालुसरे, सुभाष चोरगे, रमेश चोरगे, दत्ताराम चोरगे, विजय चोरगे, विनायक भिसे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version