रविवारी मुख्यमंत्री रेवदंड्यात पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेणार भेट

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दि. २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे येणार आहेत. यावेळी ते ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.४५ वा ठाणे निवासस्थान येथून मोटारीने रेमंड हेलीपॅड, ठाणेकडे प्रयाण,
सकाळी १०.०० वा.
रेमंड हेलीपॅड, ठाणे येथे आगमन व तेथून शासकीय हेलिकॉप्टरने रेवदंडा, जिल्हा रायगडकडे प्रयाण.
सकाळी १०.४५ वा.
JSW कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथे आगमन व तेथून मोटारीने रेवदंडा, जिल्हा रायगडकडे प्रयाण.
सकाळी ११.१५ ते निरुपणकार
पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी आगमन, भेट व राखीव.
दुपारी २.३० वा.
स्थळ :- रेवदंडा, जि. रायगड.
दुपारी ०२.३० वा. रेवदंडा येथून मोटारीने JSW कंपनीचे हेलिपॅड, साळावकडे प्रयाण.
दुपारी ०३.०० वा.
JSW कंपनीचे हेलिपॅड, साळाव येथे आगमन व तेथून शासकीय हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
दुपारी ०३.४५ वा.
रेमंड हेलीपॅड, ठाणे येथे आगमन व तेथून मोटारीने ठाणे निवासस्थानकडे प्रयाण.
सायं. ०४.०० वा.
ठाणे निवासस्थान, येथे आगमन व राखीव.

Exit mobile version