| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या रुद्रा राजू भगत या सहा वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच्यासोबत असलेले त्याचे वडीलही जखमी झाले.
अंबड औद्योगिक वसाहतीत रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील कृष्णा मिठाईच्या दुकानाकडून दातीरनगर भागाकडे जाणाऱ्या उतार रस्त्यावर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. रस्त्यालगत मिरवणूक पाहणाऱ्या गणेश भक्तांवर जाऊन ट्रॅक्टर धडकला. लहान मुलाला विसर्जन मिरवणुकीत घेऊन गेलेल्या वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.






