आजिवली केंद्रात बालकांची तपासणी

। पनवेल । वार्ताहर ।
इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन यांच्या सौजन्याने पनवेल तालुक्यातील आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

यावेळी अध्यक्षा कल्पना नागावकर, डॉ. जयश्री पाटील, अर्चना फके, अ‍ॅड. शिल्पा नागावकर, डॉ. राजेश्री बागडे आदी उपस्थित होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज भिसे आणि डॉ. नीलिमा भांडारकर यांच्या उपस्थितीमध्ये बालआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड उपस्थित होते. आजिवली केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर पाटील व डॉ. विजया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराला आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज भिसे आणि डॉ. नीलिमा भांडारकर यांच्याकडून 82 मुलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर मुलांना प्रोटीनयुक्त आहार वाटप करण्यात आला.

Exit mobile version