| उरण | वार्ताहर |
राज्यात महसूल सप्ताह सुरू आहे. या महसूल सप्ताहच्या अनुषंगाने तहसील कार्यालय उरण येथे अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव कदम उरण यांच्या विनंती नुसार उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनचे डॉक्टर्स यांनी सहभाग घेतला होता. तहसीलदार उरण डॉ. उद्धव कदम यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी शिपाई कोतवाल यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामधे रक्ततपासणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोरे, डॉ. सत्या ठाकरे आणि डॉ. घनश्याम पाटील यांनी तपासणीनंतर आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरामध्ये असोसिएशनचे डॉ. अजय कोळी, डॉ. अजय लहासे, डॉ. सपणा उतेकर, डॉ. दया परदेशी, डॉ. सविता डेरे,डॉ. वनीता पाटील यांनी आपले अमूल्य योगदान दिले. सदर शिबीरा मधे 65 कर्मच्याऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.