छोट्या मित्रांसाठी बालअभिवाचन उपक्रम संपन्न

। अलिबाग । वार्ताहर ।
गंमत शाळा आणि अभिवाचन संध्या यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यतीन घरत, श्रध्दा पोखरणकर यांच्या पुढाकाराने अलिबागमध्ये ‘बाल साहित्य अभिवाचन’ हा तीन दिवसांचा उपक्रम 3, 4, व 5 जून रोजी चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाला. मराठी बाल साहित्यातील काही निवडक आणि अभ्यासपूर्ण लेखकांच्या गोष्टींचे वाचन या प्रसंगी करण्यात आले. यावेळी अभिवाचनात वसुंधरा पोखरणकर, विपीन राऊत, श्रेया अधिकारी यांनी वाचक म्हणून भाग घेतला. तसेच कार्यक्रमाचे कार्यकारिणी म्हणून प्रतीक पानकर, तन्वी पाटील यांनी यांची भूमिका बजावली. विशेष म्हणजे या उपक्रमाचा मुलांसोबतच त्यांच्या पालकांनीही याचा आस्वाद घेतला.

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या कानावर छोट्या छोट्या गोष्टीतून गोष्ट मांडणे त्यातले सार समजून घेणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. जो पालकांच्या प्रतिक्रियांमधून सिद्ध झाला असे लक्षात येते. मुलं गोष्ट फक्त ऐकत नाहीत तर घरी गेल्यावर त्यावर बोलतात, विज्ञान कथेमधील प्रयोग घरी करून बघण्यास उत्साह दाखवतात ही या कार्यक्रम यशस्वी होण्याची पावती आहे. हा कार्यक्रमास पार पडण्यास यतीन घरत, आनंद कोळगावकर, सचिन शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version