डिकसळ शांतीनगर येथे बालसंस्कार

| नेरळ | प्रतिनिधी |

डिकसळ शांतीनगर येथे वर्षावासनिमित्त बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.सहा दिवसांच्या या शिबिरात मोठ्या प्रमाणावर लहान बालके यांचा शिबिरात सहभाग होता.

कर्जत तालुक्यातील डिकसळ शांतीनगर येथे शांतीदूत मंडळाच्या वतीने सम्यक संस्कार च्या माध्यमातून बालसंस्कार शिबीर आयोजित केले होते ,सदर शिबिरात बौद्ध धम्माचे ज्ञान देण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून दिली.तसेच पंचशील आचरण कसे करावे लागते तसेच आणापाना विपश्यना साधना याची माहिती दिली.सलग सहा दिवस चाललेल्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वैशाली बोखारे,तनुजा गायकवाड,मृणाली गायकवाड,हिराबाई हिरे,रेखा गायकवाड, उपासक सुनील जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मुलांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करून शिबिराचा सांगता समारोप झाला. तसेच या कार्यक्रमासाठी शांतीनगर येथील मुलांनी आणि नागरिक सहभागी झाले होते.

शांतीदूत अध्यक्ष नितीन गायकवाड, अध्यक्ष रमाबाई महिला मंडळ शुभांगी साळवी ल,अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विभाग चार रमेश गायकवाड, हिराबाई हिरे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका अध्यक्ष, आरपीआयचे एडवोकेट उत्तम गायकवाड, रायगड भूषण किशोर गायकवाड,कविवर्य मधुकर गायकवाड,जेष्ठ नागरिक काशिनाथ गायकवाड, तुळशीराम गायकवाड, गणेश चव्हाण,विजय पवार,प्रशांत गायकवाड, मीराबाई हिरे,शोभा चव्हाण,तनुजा गायकवाड,ज्योत्स्ना गायकवाड,पूर्वा गायकवाड, मोनिका गायकवाड,पूजा दिवाकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version