चिमुकल्यांनी साकारली किल्ले रायगडाची प्रतिकृती

| नेरळ | प्रतिनिधी |

हालीवली गावातील चिमुकल्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील बच्चे कंपनी येत आहे.

हालीवली गावातील संतोष रंभाजी बोराडे यांचा परिवारातील लहान मोठ्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. गेली 10 वर्ष ही मुले किल्ला बनवत असून, किल्ला बनवायला घरातील सगळी लहान मोठी मदत करतात आणि त्यामुळे दरवर्षी किल्लाची प्रतिकृती साकारली जाते.

बोराडे पुढच्या पिढीकडे ही परंपरा नेण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. चिमुकली बालके यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या किल्ल्याबद्दल माहिती होईल असे कार्य सुरू ठेवले आहे. या लहान मुलांनी आपल्या कल्पकतेतून चिमुकल्यांनी मेहनत, जिद्द आणि कलात्मकतेच्या जोरावर रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीतून मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी असलेली आवड आणि गड-किल्ल्यांप्रती असलेला आदर व्यक्त केला आहे. लहान वयातच मुलांनी दाखवलेली ही कलाकुसर कौतुक होत आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आपल्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. चिमुकल्यांच्या या कलाकृतीतून शिवरायांच्या इतिहासाचा अभिमान पुन्हा एकदा जागा झाला आहे.

Exit mobile version