| कोलाड | वारर्ताह |
येरळ केंद्रातील 11 जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुतारवाडी येथील झेड-बॅक फार्मवर बाल मेळावा साजरा करण्यात आला. मुलांसाठी विविध मनोरंजक कृती करुन घेतली. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख कुंदन जाधव, विद्या बुधवंत, चंद्रकांत वरखले, गजानन जाधव, अमोल राठोड, प्रशांत वाघचौरे, बादल जाधव, राजेश म्हात्रे, अरुण शेळके, भागवत भुसारे, विजय भोसले, सुगत राठोड, अंजली गुंजोटे, रेश्मा वाघचौरे, सीमा गायकवाड आणि झेड-बॅक फार्म कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले.