अभिवाचन संध्या आणि गंमत शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बालसाहित्य अभिवाचन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अभिवाचन संध्या आणि गंमत शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बालसाहित्य अभिवाचन चेंढरे ग्रामपंचायत सभागृह येथे 12 जुलै रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वा. आयोजित करण्यात आले आहे. वाचन आणि नाटक यामधली पायरी म्हणजे अभिवाचन ! या आधी अलिबागमध्ये अभिवाचनाचे सहा कार्यक्रम झाले, सहाव्या पुष्पापासून बालमित्रांसाठी अभिवाचन आयोजित करण्यात आले. सदर अभिवाचन संध्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अभिनेत्री श्रध्दा पोखरणकर यांनी केले आहे.

Exit mobile version