| अलिबाग | प्रतिनिधी |
चिंचोटी, ता.अलिबाग येथील अल्पवयीन मुलीवर गेल कंपनीत कामावर असलेल्या परप्रांतीय कर्मचार्याकडून अतिप्रसंग होण्याचा प्रसंग घडला. यामुळे शनिवारी येथील वातावरण कमालीचे तंग बनले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (21मार्च)अलिबाग येथील जिल्हा पोलीस अधिक्षकांसमवेत गेल कंपनीचे अधिकारी, चिंचोटीचे पंच कमिटी,पिडीत मुलीचे पालक आणि परिसरातील ठराविक मंडळी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत निर्माण झालेल्या वादाबाबत चर्चा करुन सामोपचाराने तोडगा काढला जाणार आहे.







